मराठी भाषा❤️

एक व्हिडिओ (दूरचित्रवाणी) बघितला आणि या विषयावर पण लिहावं वाटलं.. खरं तर मला हा प्रश्न नेहमीच पडतो की आताच्या मुलांचं काय होईल? आपल्या मराठी भाषेचं काय होईल? कारण इंग्रजी शाळेतून शिक्षण घेताना आताच्या मुलांना इंग्रजीच बोलावं लागतं आणि खूपच खूप तर जरा हिंदी ..मग आपल्या मातृभाषेच काय, आहे ना विचार करण्यासारखा प्रश्न?

मी खूप जवळून अनुभव सुद्धा घेतलाय. आजूबाजूच्या परिसरात काही मुलं भाषेची खिचडी करतात आणि इंग्रजी बोलायला नाही जमलं तर शाळेत आणि घरी पण आपण त्यांना रागावतो..पण मराठी साठी असे कुठलेच उपाय करताना बघितलं नाही..आणि यापेक्षा भारी म्हणजे काही पालक तर आपल्या मुलांबरोबर बालपणापासूनच हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यांना त्याचा अभिमान पण वाटतो..मग मुलांना नीट मराठी पण येत नाही याची पण जरा काळजी घ्यायला पाहिजे..

या समाजात आणि स्पर्धेच्या जगात इंग्रजी नक्कीच येईल हो मुलांना पण आपली मातृभाषा पण यायला पाहिजे आणि यासाठी मराठी वृत्तपत्रे, मराठी पुस्तके, मराठी मध्ये चित्रपट वा घरी तरी आवर्जून मराठी मध्ये बोलावं..विचार करा🙏

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवित.
कवी – वि. म. कुलकर्णी.

© स्नेहा

आयुष्यातील क्षण..

आपल्या क्षणाक्षणावर फक्त आणि फक्त आपलाच हक्क असावा..असं सारखं वाटत असत, पण हे शक्य नाहीये ना? कारण कधी जन्मदात्यांसाठी तो हक्क सोडावा लागतो आपलं कर्तव्य म्हणून तर कधी ज्याच्यावर प्रेम करतो वा करून बसतो ..त्याच्या नावी आपला प्रत्येक क्षण आपण जगत असतो. पण जर का हे सगळं आपल्या मनाच्या विरुद्ध दिशेने होत असेल तर? तरीही त्यांच्यासाठी सतत हसत राहायचं असतं..काही चुकीचं वा मनाला न भावणार होत असेल तरीही निमूटपणे सहन करत जातो आपण ..फक्त आणि फक्त आपली माणसं सुखात राहावी यासाठीच..पण आपल स्वतःच काय?

आपण जर फक्त आपला विचार केला..तर आपल्याला पण वाटतं ना की आपला एकही क्षण आपला नाहीच ..आज आहे उद्या नाही ..मग आपल्यासाठी नको का जगायला आपण? का वेड्यासारखं दुसऱ्यांसाठी जगतोय? आणि कुणासाठी ? एक आपले आई – बाबा सोडलेत तर कुणालाच आपली काळजी नसते आणि असेलही तरीही ती फक्त तेवढ्यापुरती ..आणि खरी की खोटी तेही नाही माहिती..या जगात कुणावर विश्वास ठेवावा हे सुद्धा आता शक्य नाहीये. मग आपण स्वावलंबी बनायला किंवा बनण्याचा प्रयत्न करायला काय ना हरकत आहे..

माहितीये जितकं बोलायला सोपं तितकच भावनिक लोकांसाठी हे कठीण आहे .. दगडांसाठी फारच सोपं असू शकत ..पण इथे आपण जिवंत माणूस आहोत की अजून कदाचित..असं वाटतं कधी काय होईल माहिती नाही ..कुठलाच विश्वास नाही ..सगळीकडे फक्त नकाब ओढलेली दुनिया आहे असं झालंय..मात्र याच दुनियेत जगायचं आहे आणि पुढे पण जायचय..खूप जगलोय आजवर दुसऱ्यांसाठी आता आपली क्षण आपल्या नावावर करून आपल्यासाठी पण जगायला शिकायचंय..
© स्नेहा लोणकर

#जगणं

बाप्पा तुझे आशीर्वाद !

“हमारी फिल्मों की तरह हमारी जिंदगी में भी end तक सब ठीक ही हो जाता है। Happys endings….
और अगर, ठीक ना हो तो वो the end नही है, Picture अभी बाकी है मेरे दोस्त”

आयुष्यात ना सारखे उतार चढाव सुरूच असतात. कधी तरी जेव्हा असं वाटल की आता सगळं ठीक होईल वा मनासारखं होईल की लगेच स्पीड ब्रेकर येतो आणि सुरू असलेली गाडी पुन्हा बंद पडायला येते, पण जर इथे Accelerate केलं की पुन्हा सुरुवात होऊ शकते. पण असं सुद्धा होतं की कितीदा पुन्हा पुन्हा हेच करायचय..तेव्हा ध्येय काय आहे हे आठवणीत आणायचं.

एखादी गोष्ट पूर्ण करायला किंवा सुरू ठेवायला मनाची शांतता पण फार महत्वाची असते. प्रत्येक व्यक्तीकडे यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा असतील. पण काही जण जेव्हा मंदिरात जातात आणि तिथे बसतात किंवा अनुभव घेतात, वेळ देतात.. तेव्हा ना एक वेगळीच Positive Energy मिळते. या मागे अनेक scientific कारणे सुद्धा आहेत आणि काहींची श्रद्धा असते.

तर काहीही वाईट विचार अथवा Negativity जेव्हा पण जाणवली तर हा अनुभव घ्यायला हरकत काय आहे ना ? आणि बऱ्याच लोकांना असे अनुभव असतील सुद्धा, हो ना? आणि जेव्हा आपण मंदिरात जायला निघतो, जाऊन बसतो, देवाकडे आशेने बघतो किंवा आभार मानतो आणि हे सगळं करत असताना आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टींचं निरीक्षण करतो. त्यातीलच काही बाबी आपल्या साठी मार्गदर्शक सुद्धा ठरतात. म्हणून काहीही झालं तरी हार मानायची नाही कारण Picture अभी बाकी है मेरे दोस्त, बाप्पा चे आशीर्वाद आहेत तर सगळं ठीक होईल.

Happy Ganesh Chaturthi 🙏

“तेरी खुशियों की बारी..”

हर दिन ढलकर शाम उगते सूरज से हारी,
एक दिन आयेगी तेरी भी खुशियों की बारी..

जमीं से पंछी भरते आसमान में उड़ान भारी,
एक दिन आयेगी तेरी भी खुशियों की बारी..

दो दो कदम चल तूने भी चली है मिलो दूरी,
एक दिन आयेगी तेरी भी खुशियों की बारी..

पर्वत से बहती नदी भी बहे समन्दर में गहरी,
एक दिन आयेगी तेरी भी खुशियों की बारी..

छोटे सपनों की पहल देखेगी दुनिया ये सारी,
एक दिन आयेगी तेरी भी खुशियों की बारी..

© स्नेहा लोणकर

अल्फ़ाज़ आंसुओं के

ज़िंदगी के किस्सों में कहानियां बेहिसाब हैं,
कभी मुस्कान तो कभी आंसू बेबुनियाद है।


चलते चलते कभी मिल जाती है खुशियां,
हंसते हंसाते कभी गम भी टकराते है।


चुनौती की दौड़ में खुदको भी भूल जाते,
इसी भुलभुलैया में अंधेरों में छा जाते है।


बाते दिल की ना किसी से कह पाते है,
अजब सवालों के जवाब ढूंढते रह जाते है।


इन्हीं सपनों के जाल में फंसकर कैद हुए,
इतने डूब गए की हंसी के रास्ते ही खो गए।


फिर भी किसी बहाने से खुद संभल गए,
आंखों के आंसू ही ढाल बनकर साथ रहे।


रिश्ता चाहे खुशी भरा या गम का हो साया,
पर कभी दिल और आंखों ने फर्ज़ है निभाया।


खुशियों में तो आंखों ने खुशी से रुला लिया,
गम और बेरुखी में भी बिन बोले सहारा दिया।


जब दुनिया ने जरूरी वक़्त में मुंह मोड़ दिया,
तब इन्हीं आंसुओं ने हमें अपना बना लिया।

© स्नेहा लोणकर